MahaDBT : ठिबक, तुषार सिंचन पात्र लाभार्थ्यांची जानेवारी महिन्याची यादी जाहीर, यादी डाऊनलोड करा

MahaDBT Farmer November Lottery List : महाडीबीटी शेतकरी पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध अशा योजनांचा लाभ देण्यात येतो. शेतकऱ्यांमार्फत करण्यात आलेला विविध घटकांसाठी लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करून त्यांना विविध उपकरण खरेदीसाठी सबसिडी देण्यात येते. ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना अंतर्गत महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची नोव्हेंबर महिन्याची लॉटरी यादी संबंधित विभागाकडून जाहीर करण्यात आलेली असून पात्र शेतकरी यादीत नाव पाहू शकतात. यादी जिल्हानिहाय खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

MahaDBT Farmer List

साप्ताहिक महाडीबीटी वेबसाईटवर शेतकऱ्यांची लॉटरी पद्धतीने निवड पूर्ण झाल्यानंतर, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणी करत मोबाईलवर लॉटरी लागल्याचा एसएमएस पाठविण्यात येतो, त्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना प्रकल्पासाठी कागदपत्र व इतर आवश्यक कागदपत्र पोर्टलवर अपलोड करावी लागतात. या संदर्भातील सूचना शेतकऱ्यांना SMS च्या माध्यमातून मोबाईलवर पाठवण्यात येतात. ठिबक व तुषार सिंचनाची अशीच यादी 2 जानेवारी 2023 रोजी लॉटरी पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आलेली असून निवड झालेल्या शेतकऱ्यांना महाडीबीटी फार्मर पोर्टलवर लॉगिन करून आवश्यक कागदपत्र अपलोड करावी लागतील.

महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाकडून 2 जानेवारी 2023 रोजी कृषी यांत्रिकीकरण, सिंचन सुविधासाठी लॉटरी काढलेली असून या लॉटरीत निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर यासंदर्भातील माहिती पाठवण्यात आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झालेला असेल, अश्या सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पोर्टलवर आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत आणि ज्या शेतकऱ्यांना संदेश प्राप्त झाला नसेल, त्यांनी यादीमध्ये आपलं नाव पाहावं.

कोणती कागदपत्र अपलोड करावी लागतील ?

  • सातबारा व आठ अ उतारा (डिजिटल स्वाक्षरीतील किंवा तलाठी स्वाक्षरीतील)
  • सामायिक क्षेत्र असल्यास खातेदारांचा संमतीपत्र
  • सातबारा उताऱ्यावर सिंचन स्त्रोत नोंद नसल्यास स्वयंघोषणापत्र
  • अर्जदार अज्ञान किंवा 18 वर्षाखालील असेल तर, अ.पा.क स्वयघोषणापत्र
  • वैद्य जात प्रमाणपत्र
  • शेतकऱ्यांचा आधारकार्ड
  • बँक पासबुकचा झेरॉक्स

👇👇👇👇👇👇👇👇

जिल्हानिहाय लाभार्थी यादी डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *