Recurring Deposit : पोस्ट ऑफिसात फक्त 100 रु. गुंतवा आणि लाखात परतावा मिळवा, नवीन योजना

जनसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला व विद्यार्थ्यांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच पोस्ट ऑफिसकडून विविध बचत योजना राबविण्यात येतात. या विविध योजना जनसामान्य लोकांसाठी खूपच फायद्याच्या ठरत आहेत. अगदी कमी पैशांमध्ये चांगले गुंतवणूक पोस्ट ऑफिसकडून नागरिकांना दिली जात आहे. पोस्ट ऑफिस विश्वासनीय खाते असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लोक याठिकाणी गुंतवणूक करतात. आपण आज अशाच एका नवीन योजनेबद्दलची माहिती संबंधित लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

पोस्ट ऑफिसच्या या नवीन योजनेअंतर्गत नागरिकांना पोस्ट ऑफिसमध्ये आवर्ती ठेव खाते (रिकरिंग डिपॉझिट खाते) उघडावं लागेल. यामध्ये त्यांना किमान 100 रुपयांची गुंतवणूक करता येईल. ही गुंतवणूक पाच वर्षे चालू ठेवली, तर गुंतवणूकदारांना 1.80 लाख रुपयांचा निधी मिळू शकेल. पोस्ट ऑफिसची ही रिकरिंग डिपॉझिट किंवा आवर्ती ठेव योजना एक लहान बचत योजना आहे.

पोस्टाच्या या खात्यावर देखील आयकर लागू होतो. खात्यात मिळणाऱ्या एकत्रित व्याजावर टीडीएसच्या स्वरूपात आयकर आकारला जातो; परंतु जर तुमची एकूण ठेव रक्कम 40,000 रुपयापेक्षा जास्त असेल, तरच रक्कम ही वजा केली जाते. जर तुमची ठेव रक्कम यापेक्षा कमी असेल, तर तुमच्यावर 10 टक्के दराने कर आकारला जाईल.

सध्या आवर्ती खाते ठेवीवर पोस्ट ऑफिसकडून 6.7 टक्के व्याज मिळत आहे. या बचत योजनेत संबंधित गुंतवणूकदारांना किती व्याज मिळेल हे सरकार निश्चित करत. केंद्रीय अर्थ मंत्रालय प्रत्येक तिमाहीत सर्व लहान बचत योजनांसाठी व्याजदरामध्ये सुधारणा करत असतं. त्यामुळेच नक्कीच शासनाकडून दिला जाणारा हा व्याजदर गुंतवणूकदारांना चांगला व फायदेशीर ठरतो.

सुरुवातीला एखाद्या अर्जदारांनी गुंतवणूक केल्यास रिकरिंग डिपॉझिट खात्याचा कालावधी पाच वर्षासाठी असेल. त्यानंतर तुम्हाला त्या खात्याची मुदतवाढ करावयाची असल्यास पोस्टमास्तरांना अर्ज देऊन किंवा पोस्टमध्ये जाऊन आणखी पाच वर्ष मुदतवाढ करू शकता. तुम्हाला कोणत्याही बँकेत असे खाते सुरू करावयाचे असेल, तर सहा महिने, 1 वर्ष, 2 वर्ष आणि 3 वर्षाचा पर्याय मिळू शकतो.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *